आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणांमुळे ओलिताखाली आलेली आहे. जायकवाडी या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे माती व दगडाचे आहे. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहारनजीक असलेल्या जायकवाडी या गावांमध्ये आहे. धरणाचे बांधकाम हे 1965 साली सुरू झाले होते व ते 1976 मध्ये पूर्ण झाले. या धरणांमुळे जवळपास 35000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. धरणाची सर्वोच्च उंची 41.3 मी. आहे व लांबी 9997.67 मी. आहे.
           जायकवाडी धरणाला नाथसागर नावानेही ओळखले जाते. नाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीतील हे धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही धरणाचा नावलौकिक आहे. शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या धरणाचा जन्म झाला. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधानांचे पाय या मातीला लागलेले आहेत. मराठवाड्याची तहान भागवणे, शेती फुलवणे, उद्योग धंदे वाढावे या उद्देशाने या धरणाची स्थापना करण्यात आली होती. धरणाची 102 टीमसी पाणीसाठा येवडी प्रचंड क्षमता आहे.

जाणून घेऊया जायकवाडी धरणाविषयी अजून काही माहिती संक्षिप्त मध्ये:
दरवाजे-
धरणाचे दरवाजे S आकाराचे असून त्यांची लांबी 471 मी. इतकी आहे.
जायकवाडी धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत, त्यापैकी 9 दरवाजे हे आपत्कालीन परिस्थिती मध्ये उघडण्यात येतात. या दरवाजांचा आकार हा 12.50 × 7.90 मी. आहे. धरणातून 22656 एव्हडा सर्वोच्च विसर्ग केला जाऊ शकतो.
पाणीसाठा-
धरणाचे एकूण क्षेत्रफळ हर जवळपास 350 वर्ग किमी. आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2909 दशलक्ष घनमीटर असून त्यातील वापरण्यायोग्य क्षमता ही 2170 दशलक्ष घनमीटर आहे. धरणामध्ये एकूण 35000 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आहे. धरणामुळे जवळपास 105 गवे हे ओलिताखाली गेलेली आहेत.
कालवा-
डावा कालवा-
धरणाचा डावा कालवा हा 208 किमी लांबीचा आहे व त्याची क्षमता 100.80 घनमीटर/सेकंद आहे.
उजवा कालवा-
धरणाचा उजवा कालवा हा 132 किमी लांबीचा आहे व त्याची क्षमता 67.71 घनमीटर/सेकंद आहे.
वीज उत्पादन-

जायकवाडी धरणातील जलप्रपाताची उंची 94 फूट आहे. धरणाची वीज निर्मित क्षमता ही 12 मेगा वॅट आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्य-
जायकवाडी धरणात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. नाथ सागर जलाशयात 30 विविध आकाराचे बेट तयार करण्यात आलेले आहेत. पक्षासाठी लावण्यात आलेल्या झाडांमुळे येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्षांचे प्रमाण हे अधिक आहे. जायकवाडी परिसरात जवळपास 200 प्रजातीचे पक्षी आढळतात, ज्यामध्ये 70 प्रजाती या बाहेर देशातून आलेले असतात. या स्थलांतरीत पक्षामध्ये प्रामुख्याने क्रेन, फ्लिमिंगो,पिंटेल,गॉडविट्स हे पक्षी आढळतात.

Comments

Popular posts from this blog

झटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते

उसाचा रस पिण्याचे तोटे वाचून तुम्ही थक्क व्हाल,खास करून या व्यक्तींनी राहावं सावध !