Posts

Showing posts from October, 2017

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

Image
जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणांमुळे ओलिताखाली आलेली आहे. जायकवाडी या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे माती व दगडाचे आहे. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहारनजीक असलेल्या जायकवाडी या गावांमध्ये आहे. धरणाचे बांधकाम हे 1965 साली सुरू झाले होते व ते 1976 मध्ये पूर्ण झाले. या धरणांमुळे जवळपास 35000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. धरणाची सर्वोच्च उंची 41.3 मी. आहे व लांबी 9997.67 मी. आहे.             जायकवाडी धरणाला नाथसागर नावानेही ओळखले जाते. नाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीतील हे धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही धरणाचा नावलौकिक आहे. शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या धरणाचा जन्म झाला. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधानांचे पाय या मातीला लागलेले आहेत. मराठवाड्याची तहान भागवणे, शेती फुलवणे, उद्योग धंदे वाढावे या उद्देशाने या धरणाची स्थापना करण्यात आली होती. धरणाची 102 ट

महात्मा गांधींबद्दलच्या १० गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच माहित नसतील..

Image
1. ज्या इंग्रजांविरुद्ध गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्याच इंग्रजांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या गौरवार्थ पोस्ट तिकीट सुरु केले. 2. शांतता आणि अहिंसेचं प्रतिक असणाऱ्या गांधीजींना सर्वोच्च अशा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी चक्क 5 वेळा नामांकन मिळालं होतं. पण ज्यावर्षी हा पुरस्कार त्यांना द्यायचा ठरला त्याच वर्षी गांधीजींचा मृत्यू झाला. 3. गांधीजी दिवसाकाठी सरासरी 18 किलोमीटर चालायचे. म्हणजेच त्यांच्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत ते 79,000 किलोमीटर चालले. विचार केला तर हे अंतर दोनवेळा जगप्रवास करण्याइतके होईल!! 4. अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स हा गांधीजींचा चाहता होता. तो गांधीजींसारखाच गोल भिंगाचा चष्मा वापरायचा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा गांधीजीना आपले आदर्श मानतात. 5. भारतातील 53 मोठ्या रस्त्यांना आणि विदेशातील 48 मार्गांना गांधीजींचं नाव दिलं गेलंय. यात लहान रस्त्यांची संख्या वेगळी आहे. प्रत्येक शहरात एक तरी रोड गांधीजींच्या नावाने असतोच असतो. 6. गांधीजींनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही विमानप्रवास केला नाह

उसाचा रस पिण्याचे तोटे वाचून तुम्ही थक्क व्हाल,खास करून या व्यक्तींनी राहावं सावध !

Image
उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते, ते म्हणजे उसाचा रस.उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्याम ध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्यासही मदत करतो.उसाच्या सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दूर होते व भरपूर ऊर्जा ही मिळते. उसाचा रस आरोग्यास चांगलाही मानला जातो. कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पिशक तत्वे असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात व दातांच्या समस्याही कमी होतात. उसाच्या रसाचे असे काही फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो. जाणून घेऊया उसाचा रस पिण्याचे काही तोटे- मोठ्या प्रमाणात कॅलरी व कार्बोहायड्रेट असल्यामुळे उसाचा रस हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उसाचा रस सेवन करणे टाळा. उसाच्या रसात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायबिटीज सारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींनी उसाचा रस पिणे कट